|| शिवमुद्रा पथक ||
शिवमुद्रा ढोल ताशा आणि ध्वज पथक हे पारंपरिक ढोल ताशा वादकांचे पथक आहे. पुण्यातील ढोल-ताशा पथकाचे अर्ध्वयु कै. आप्पासाहेब पेंडसे यांच्या परंपरेचे पाईक म्हणून हे पथक वाटचाल करत आहे.
गणेशोत्सवासाठीचे सराव सत्र आणि प्रत्यक्ष मिरवणुकीतील शिस्तबद्धपणा, साचेबद्धता, यासाठी आम्ही समर्पित आहोत. पथकाचे अध्यक्ष श्री. आशुतोष देशपांडे हे कायमच त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर या पथकाची परंपरा पुढे घेऊन जात आहेत. यामुळेच दरवर्षी नव्या वादकांना संधी देऊन त्यांना या परंपरेत जोडण्याचा आमचा प्रयत्न असतो. आजमितीला पथकात पाचशेहून अधिक वादक वादन करतात. हे केवळ वादक नसून कोणत्याही मोबदल्याशिवाय निस्वार्थ वृत्तीने काम करणारे आमचे कुटुंब आहे.
पथकाच्या स्थापनेपासून वादकांनी शेकडो मिरवणुकांमध्ये बहरदार वादन करत पुणेकरांची मने जिंकली. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांची वादनाने शोभा वाढवली. म्हणूनच मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणेशोत्सव मंडळ, मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट, जिलब्या मारुती मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळ अशा नावाजलेल्या मंडळांनी आमच्या नावलौकिकात आणखी भर घातली आहे. दरवर्षी या मंडळांपुढे वादनाची संधी मिळणे, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
|| मानाचे गणपतींचे वादन ||
श्री तांबडी जोगेश्वरी गणपती ट्र्स्ट
श्री तुळशीबाग गणपती ट्र्स्ट
श्री केसरीवाडा गणपती ट्र्स्ट
"शिवमुद्रा" फक्त पथक नाही तर एक परिवार !
ढोल - ताशा पथक ही महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा जपण्यासाठी ‘शिवमुद्रा पथक’ प्रयत्न करत आहे. या पथकात परिसरातील नव्हे, तर शहरातील अनेक भागातील तरूण- तरुणींसह वयोवृद्धांचाही समावेश आहे.
गणेशोत्सवात ढोल-ताशा पथक नेहमीच लक्ष वेधून घेते. त्यात वेगळेपण जपण्याचा ‘शिवमुद्रा पथक’ प्रयत्न करत आहे.
ढोल पथकाच्या माध्यमातून तरुणांना एकत्र आणण्याचे काम होत आहे. एक उत्साही वातावरण यामुळे तयार होते. या
पथकाच्या माध्यमातूनच आम्ही वर्षाभर विविध सामाजिक उपक्रमही राबवितो.
Well - known Events Where we have Performed
Zee Critic Awards
Maha Marathon
14th National Woman Hockey
Mahashivratri, Kutch, Gujarat